Kagawad

शेडबाळ येथे जैन समाजाचा दशलक्षण महापर्व संपन्न

Share

शेडबाळ येथील भगवान महावीर जैन मंदिरात दशलक्षण महापर्वानिमित्त अनंतनौपी विसर्जन व जानवे धारण कार्यक्रम भक्तीमय वातावरणात पार पडला.

शेडबाळ येथे दशलक्षण महापर्वानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रतिष्ठाचार्य कुमार आलगाौडे यांनी त्याग आणि स्व-नियंत्रणाचे महत्त्व स्पष्ट केले. मामासाहेब पाटील, सुनील पाटील व अतिक्रांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली विसर्जन व जानवे धारण सोहळा पार पडला. सकाळी भगवान महावीरांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. तसेच पद्मावती देवीचा ओटी भरण कार्यक्रम पार पडला. या सोहळ्याला पोलीस पाटील रामगौडा पाटील, चिन्नाप्पा नांदणी, बाबासाहेब सौदत्ती, कुमार मालगावे यांच्यासह कागवाड, उगार, शिरगुप्पी व मंगलसुळी येथील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: