Belagavi

मण्णीकेरी येथे प्रभुदेव मंदिराच्या कॉलम पूजनाचा शुभारंभ

Share

बेळगाव तालुक्यातील कडोली जिल्हा पंचायत कार्यक्षेत्रात येणाऱ्या मण्णीकेरी गावात आज प्रभुदेव मंदिराच्या कॉलम पूजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

कर्नाटक राज्याचे सार्वजानिक बांधकाम मंत्री व बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी, चिकोडीच्या खासदार प्रियंका जारकीहोळी तसेच युवा नेते राहुल जारकीहोळी यांच्या आदेशानुसार हा शुभारंभ करण्यात आला.

केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील यांच्या हस्ते कॉलम पूजन पार पडले. या कार्यक्रमाप्रसंगी मण्णीकेरी, कडोली, केदनूर आणि बोंबरगा या पाच गावांतील मंदिर कमिटीचे सदस्य तसेच स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: