Belagavi

सुळगानजीक झाडाला आदळून १६ चाकी ट्रक पलटी

Share

बेळगाव तालुक्यातील सुळगा गावाजवळील मधुरा हॉटेलसमोर बेळगुंदीकडून बेळगावच्या दिशेने येणारा ट्रक पहाटेच्या सुमारास पलटी झाला.

आंध्र प्रदेश पासिंगचा हा ट्रक मॅग्निज वाहून नेत असताना हा अपघात घडला. सुळगा फाट्याजवळील वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी झाल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, चालक झोपेत असावा किंवा रस्ता अरुंद असल्याने वळणाचा अंदाज न आल्यामुळे हा अपघात घडला असावा.

अपघाताच्या वेळी ट्रक आंब्याच्या झाडाला आदळल्यामुळे मोठा अपघात टळला आणि चालक सुदैवाने सुरक्षित बचावला. मात्र, झाड रस्त्यावर आडवे पडल्यामुळे बेळगुंदी-बेळगाव मार्गावरील वाहतूक खोळंबली असून रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. घटनास्थळी दाखल झालेल्या बेळगाव ग्रामीण पोलिसांनी रस्ता मोकळा करण्यासाठी झाड हटवण्याचे काम तातडीने सुरू केले आहे. अपघाताची नोंद घेऊन पोलीस पुढील कायदेशीर तपास करत आहेत.

Tags: