कागवाड येथील विद्यावर्धन शिक्षण समितीचे अध्यक्ष व दत्त साखर कारखान्याचे संचालक ज्योतिकुमार सिद्धगौडा पाटील यांना ‘टाइम्स ऑफ इंडिया’ आणि ‘विजय कर्नाटक’ समूहाच्या वतीने ‘व्हीके एक्सलन्स अँड ऑनर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

बंगळूर येथील हॉटेल ताजमध्ये पार पडलेल्या सोहळ्यात राज्याचे वनमंत्री रामलिंगा रेड्डी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

ज्योतिकुमार पाटील यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या पत्नी शिल्पा ज्योतिकुमार पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

या सोहळ्याला चित्रपट अभिनेते अजय राव, टाइम्स ऑफ इंडिया बेंगलोर मिररचे संपादक दीपक सलुला, केईएचे कार्यकारी संचालक एच. प्रसन्न आणि विजय कर्नाटकचे संपादक सुदर्शन जनिंगनहल्ली उपस्थित होते.
सीमाभागात आदर्श शिक्षण संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विद्यावर्धन शिक्षण समितीच्या शैक्षणिक सेवेची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला असून, कागवाड परिसरात याबद्दल आनंद व्यक्त होत आहे.


Recent Comments