शासकीय कार्यालयाचा खाजगी संस्थेच्या कार्यक्रमासाठी बेकायदेशीरपणे वापर करूनही संबंधित अधिकाऱ्यांनी मौन बाळगल्याने संशय व्यक्त केला जात आहे.

खानापूर तालुक्यातील बीड ग्रामपंचायत कार्यालयात एका खाजगी संस्थेचे शिबीर आयोजित करून लोकप्रतिनिधींच्या जागेवर खाजगी व्यक्तींनी कारभार चालवल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत प्रश्न विचारला असता तालुका पंचायत गटविकास अधिकारी (बीडीओ / ईओ) रमेश मेत्री यांनी जबाबदारीने उत्तर देण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सारे पुरावे उपलब्ध असतानाही ग्रामविकास अधिकारी (पीडीओ) आणि संबंधित खाजगी संस्थेवर कारवाई करण्याऐवजी गटविकास अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे.
शासकीय मालमत्तेचा गैरवापर करण्यास खतपाणी घालणाऱ्या अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर जिल्हाधिकारी आणि जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी (सीईओ) तात्काळ स्वतःहून चौकशी करून कडक शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी नागरिक व शेतकरी संघटनांनी केली आहे.


Recent Comments