Khanapur

पारीशवाड-इटगी रस्त्याच्या डांबरीकरणाची मागणी

Share

खानापूर तालुक्यातील पारीशवाड ते इटगी रस्त्याची दुरवस्था झाली असून, या रस्त्याचे डांबरीकरण करावे, या मागणीचे निवेदन युवा नेते भरतेश तोरोजी यांनी लोकोपयोगी व सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांना दिले.

पारीशवाड ते इटगी दरम्यानचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्थेत आहे. त्यामुळे दररोज ये-जा करणारे नागरिक, विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे युवा नेते भरतेश तोरोजी यांनी जिल्हा प्रभारी व सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट घेऊन रस्त्याच्या दुरुस्तीची व डांबरीकरणाची मागणी निवेदनाद्वारे केली.

या निवेदनाची दखल घेत मंत्री सतीश जारकीहोळी यांनी संबंधित रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करून वाहतूक सुरळीत करण्याचे सकारात्मक आश्वासन दिले.

Tags: