लोकशाही व्यवस्थेत थेट निवडणूक जिंकणे शक्य नसल्याने भाजप नेते कुटील राजकारणाचा अवलंब करत असल्याचा जोरदार हल्लाबोल मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केला आहे.

निवडणूक आयोगाच्या मदतीने मतदारांची अदलाबदल करणे आणि अल्पसंख्याक, मागासवर्गीय, दलित व गरिबांचे हक्क हिरावून घेण्याचे लाजीरवाणे काम भाजप करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

राज्याचा मुख्य प्रतिनिधी आणि पक्षाचा प्रमुख या नात्याने प्रत्येक मतदाराच्या हक्काचे संरक्षण करण्याची संपूर्ण जबाबदारी माझी असून, ती मी पूर्ण ताकदीने पार पाडेन, असे शिवकुमार यांनी स्पष्ट केले.
वीरशैव स्वामींच्या कार्यक्रमातील माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असून, सर्वधर्मांना समान संरक्षण देणे हेच माझे धोरण आहे. विरोधकांनी माझा सत्तेचा अहंकार उतरवायचा असल्यास जरूर उतरवावा, मला त्याचे कोणतेही दुःख नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.


Recent Comments