कागवाड तालुक्यातील शेडबाळ येथे यादवाडे कुटुंबाने महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्याची ७० वर्षांची परंपरा कायम ठेवली आहे. आजोबा, मुलगा आणि नातू अशा तीन पिढ्यांनी ही अनोखी देशभक्तीची परंपरा जपली आहे.

स्वातंत्र्यसैनिक स्व. जिन्नप्पा यादवाडे यांनी १९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनादरम्यान शेडबाळ रेल्वे स्थानकावर महात्मा गांधीजींची भेट घेतली होती. गांधीजींच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी लढा दिला आणि तेव्हापासून गावात गांधी जयंती साजरी करण्यास सुरुवात केली.

सुरुवातीला बैलगाडी आणि सायकलवरून काढली जाणारी ही मिरवणूक यंदा उघड्या वाहनावर प्रतिमेची स्थापना करून हत्तीसह वाजतगाजत काढण्यात आली. यादवाडे कुटुंबात इतर कोणत्याही सणापेक्षा गांधी जयंतीलाच सर्वोच्च महत्त्व दिले जाते.
स्व. जिन्नप्पा यांच्यानंतर त्यांचे सुपुत्र बाहुबली यादवाडे आणि नातवंडांनी ही परंपरा पुढे चालवली आहे. या प्रसंगानिमित्त यादवाडे कुटुंबाकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही संपूर्ण ग्रामस्थांसाठी भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.


Recent Comments