Kagawad

उगार साखर कारखान्यात ८३ वा गणेशोत्सव संपन्न

Share

उगार साखर कारखान्यात ८३ वा गणेशोत्सव ११ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा केल्यानंतर भक्तीमय वातावरणात गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.

उगार साखर कारखान्याच्या ८३ व्या गणेशोत्सवानिमित्त सलग ११ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी भाविक वातावरणात श्रींच्या मूर्तीचे विसर्जन पार पडले. कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक चंदन शिरगावकर, कार्यकारी संचालक शिरगावकर, उगार महिला मंडळाच्या अध्यक्षा राधिकाताई शिरगावकर, माजी अध्यक्षा स्मिताताई शिरगावकर, गीतालीताई शिरगावकर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रोज अभंग, भजन, अथर्वशीर्ष पठण व मंतरपुष्पांजली असे कार्यक्रम पार पडले. पूजक राजेश जोशी यांनी हे धार्मिक विधी संपन्न केले. या सोहळ्याला जिमखाना सरचिटणीस नितीन पतकी, सहचिटणीस श्रीकांत भट, रमेश शिवगुणसी, हणमंत गणेशवाडी, महाव्यवस्थापक भुजुवली अकवाटे, अतुल नाईक, प्रसाद सातारकर, ए. बी. होन्ननवर, श्रीहरी विद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थी, महिला मंडळ, भजन मंडळ व कर्मचारी उपस्थित होते.

सुकुमार बन्नूर
इन न्यूज, कागवाड

Tags: