खानापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजाची विक्री करणाऱ्या एका इसमावर पोलिसांनी कारवाई करत त्याला रंगेहाथ पकडले आहे.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी सुमारे ७०० ग्रॅम वजनाचा गांजा, १५ हजार रुपयांचा मुद्देमाल आणि गांजा विक्रीतून मिळालेले ५४० रुपये रोख जप्त केले आहेत.

नौशाद मेहबूब सनदी (वय ४२, रा. हिरेहट्टीहोळी, ता. खानापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
आरोपी ४ ऑक्टोबर रोजी दुपारी १ ते २.५५ च्या सुमारास हिरेहट्टीहोळी परिसरातील गाडीकोप्प क्रॉसजवळ दुचाकीवरून येऊन गांजा विक्री करत असताना पोलिसांच्या नजरेस पडला.
पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, अमली पदार्थांच्या या बेकायदेशीर विक्रीविरोधात पुढील तपास सुरू आहे.


Recent Comments