जांबोटी (ता.खानापूर ) येथील वनदेवी मल्टीपर्पज को- आँप.सोसायटीच्यावतीने सोसायटीचे उपाध्यक्ष सुनिल चिगुळकर यांची कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षक संघ (र)बेंगळूर, बेळगाव जिल्हा घटक कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून शिक्षक संघाच्या जिल्हा अध्यक्षपदी कणकुंबी हायस्कूलचे मुख्याध्यापक सुनिल चिगुळकर यांची एकमताने निवड करण्यात आली.

या निमित्त खानापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदारांच्या हस्ते सोसायटीच्या सभागृहात शनिवारी दि.३ रोजी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनश्री मल्टीपर्पज को.आँप.सोसायटीचे चेअरमन लक्ष्मणराव कसर्लेकर होते.
व्यासपिठावर सत्कार मुर्ती उपाध्यक्ष सुनिल चिगुळकर,संचालक पुंडलिक पाटील,दर्शन नाईक, परशराम गावडे,नेताजी घाडी, दौलत कोलीककर, पवन गायकवाड,दत्त देसाई, तसेच निलावडे ग्राम पंचायत माजी उपाध्यक्ष विनायक मुतगेकर आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत दत्तू देसाई यानी केले.

यावेळी खानापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार व संचालक मंडळाच्या उपस्थितीत माध्यमिक जिल्हा शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल वनदेवीचे सोसायटीचे उपाध्यक्ष व कणकुंबी हायस्कूलचे मुख्याध्यापक सुनिल चिगुळकर यांचा शाल , पुष्हार व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार म्हणाले की,मुख्याध्यपक सुनिल चिगुळकर यानी शिक्षकी पेशाबरोबरच पत्रकार,समाज सेवक, सहकार क्षेत्रआदी क्षेत्रात सेवा बजावली आहे. शिस्तबध्द, शांततेने कार्य करण्याची त्याची पध्दत असल्याने सर्वाच्या मर्जी असल्याने त्याना माध्यमिक शिक्षक संघाच्या जिल्हा अध्यक्ष पदाची धुरा मिळाली.या बद्दल त्याचे कौतुक करावे तितके कमीच आहे.तितकेच ते भाग्यशाली आहेत. माझ्या सहवासात असल्याने शिक्षकांच्या समस्या त्यानी जवळून पाहिल्या आहेत.जिल्हा अध्यक्ष पद हे खानापूर पहिल्यांदाच मिळाले आहे.हे तालुक्याचे भाग्य आहे. ते शिक्षकांच्या समस्या नक्कीच सोडवितील हा माझा विश्वास आहे.त्याना आमच्या शुभेच्छा कायम राहतील.असे मत व्यक्त केले.
य़ावेळी सत्कार मूर्ती मुख्याध्यापक सुनिल चिगुळकर यानी सत्कारा बदल कृतज्ञता व्यक्त केली.व आपण केलेल्या सेवेबदलचा आढावा सांगीतला.
यावेळी आभार पुंडलिक पाटील यानी मानले.


Recent Comments