खानापूर तालुक्यातील कालमणी गावात गेल्या पाच दिवसांपासून रानटी हत्तींच्या कळपाने पिकांचे प्रचंड नुकसान केले असून शेतकरी संकटात सापडले आहेत.

खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या सूचनेनुसार भाजप जिल्हा शेतकरी मोर्चाचे उपाध्यक्ष सदानंद पाटील यांनी शेतात जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली.

काही शेतकऱ्यांनी भरपाईसाठी लागणारी कागदपत्रे वेळेवर मिळत नसल्याची बाब सदानंद पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर पाटील यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तत्काळ संपर्क साधून शेतकऱ्यांना आवश्यक ती कागदपत्रे विनाविलंब देण्याची सूचना केली.

यावेळी दौलत कोळीकार, कृष्णा भारणकर, भीमराव भारणकर, महादेव भारणकर, सोमाजी भारणकर, दिनकर भारणकर, शंकर भारणकर, संतोष भारणकर, मारुती भारणकर, अंकुश भारणकर, विनायक पिळणकर, योगेश नाईक, विश्वनाथ भारणकर, सातेरी भारणकर, तानाजी भारणकर यांच्यासह स्थानिक शेतकरी उपस्थित होते.



Recent Comments