Dharwad

धारवाडमध्ये माजी आमदार अमृत देसाई यांच्या नेतृत्वाखाली ट्रॅक्टर रॅली

Share

राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा आणि दुष्काळ भरपाई देण्यातील दुर्लक्षाचा निषेध करत माजी आमदार अमृत देसाई यांच्या नेतृत्वाखाली भव्य ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली.

धारवाड तालुक्यातील शिवल्ली येथून या ट्रॅक्टर रॅलीला सुरुवात झाली. माजी आमदार अमृत देसाई यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवून या मोर्चाचे नेतृत्व केले.

ही रॅली हेब्बळ्ळी, चंदनमट्टी, कवलगेरी, सोनापूरसह सहाहून अधिक गावांतून प्रवास करत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.

सरकारने जाहीर केलेली २५०० रुपयांची भरपाई अत्यंत तोकडी असून प्रतिएकरी ५० हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनात गंगानागौडा पाटील कुलकर्णी, शंकर कोमारदेसाई, राजशेखर मुद्दी यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले होते.

Tags: