Belagavi

बेळगावमध्ये चिनी मांजामुळे इंजिनिअरिंग विद्यार्थ्याचा मृत्यू

Share

१ ऑक्टोबर रोजी माळमारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गांधीनगर ओव्हरब्रिजजवळ १९ वर्षीय इंजिनिअरिंगचा विद्यार्थी ध्रुव करजगी हा दुचाकीवरून जात असताना त्याच्या गळ्यात चिनी मांजा अडकला. यामुळे दुचाकीवरील नियंत्रण सुटून खाली पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची गंभीर दखल घेत बेळगाव पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांच्या नेतृत्वाखाली विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. खडे बाजारसह प्रमुख बाजारपेठांमध्ये तपासणी करून चिनी मांजा जप्त करण्यात आला असून हा मांजा कुठून पुरवला जात आहे, याचा शोध घेण्यासाठी विशेष पथक रवाना करण्यात आले आहे.

नागरिकांनी व पालकांनी या प्राणघातक चिनी मांजाचा वापर करू नये, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे. तसेच असा मांजा कोणी विक्री करत असल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Tags: