केंद्र सरकारच्या भविष्य निर्वाह निधी (पीएफ) पैसे काढण्याच्या नवीन नियमांविरोधात हुब्बळ्ळी येथील गार्मेंट्स कामगारांनी आक्रमक भूमिका घेत राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केले.

हुब्बळ्ळीच्या तारीहाळ परिसराजवळ शेकडो महिला कामगारांनी अचानक राष्ट्रीय महामार्गावर उतरून केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

कामगारांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या नियमानुसार नोकरी सोडल्यानंतर दोन महिन्यांत सर्व पीएफ रक्कम मिळत होती, ज्यामुळे कामगारांना पुढील आयुष्याची तरतूद करणे शक्य होत होते. नवीन नियमानुसार केवळ ७५ टक्के रक्कम तात्काळ मिळते आणि उर्वरित २५ टक्के रक्कमेसाठी एक वर्ष वाट पाहावी लागते. हा नियम कामगार विरोधी असून तो तात्काळ मागे घेऊन जुनेच नियम लागू करावेत, अशी मागणी आंदोलकांनी केली.
पोलीस आणि कामगार अधिकाऱ्यांनी कामगारांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिल्यानंतर महिला कामगारांनी आपले आंदोलन मागे घेतले.


Recent Comments