धारवाड कृषी विद्यापीठाच्या आवारात आजपासून सुरू झालेल्या कृषी मेळाव्यात स्टॉलचा शेड कोसळून तीन जण किरकोळ जखमी झाले.

धारवाड कृषी विद्यापीठात आज ही घटना घडली. स्टॉलसाठी उभारलेला शेड अचानक कोसळल्याने तीन जण आत अडकले होते. स्थानिक नागरिक आणि सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांनी तत्परता दाखवत त्यांना सुखरूप बाहेर काढले. जखमींवर स्थानिक वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून उपचार करण्यात आले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.



Recent Comments