चामराजनगर जिल्हयातील जनतेला आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक ताकद देऊन या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केले. कौलेगाल आणि हणूर मतदारसंघातील विविध विकासकामांचे उद्घाटन आणि पायाभरणी प्रसंगी ते बोलत होते.



चामराजनगर जिल्ह्यातील जनतेला आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक ताकद देऊन या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केले. कौलेगाल आणि हणूर मतदारसंघातील विविध विकासकामांचे उद्घाटन आणि पायाभरणी प्रसंगी ते बोलत होते. या भागाच्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरेचा उल्लेख करत सर्व घटकांच्या कल्याणासाठी आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्यासाठी सरकार निरंतर कार्य करत राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.



आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी कौलेगाल परिसरातील पारंपरिक रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी हातमाग क्षेत्राला औद्योगिक दर्जा देण्याच्या ऐतिहासिक निर्णयाची माहिती दिली. याशिवाय सुवर्णवती सिंचन योजनेअंतर्गत १२० कोटी रुपयांच्या कामांचा आदेश, गुंड्लूपेट भागातील ४५० कोटींच्या सिंचन योजना आणि चामराजनगर विद्यापीठाचे नामकरण डॉ. बी. आर. आंबेडकर विद्यापीठ करण्याबाबत मंत्रिमंडळात निर्णय घेण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.



Recent Comments