Khanapur

खानापुरात करीकट्टी येथे केएमएफच्या नवीन दूध डेअरीचे उद्घाटन

Share

खानापूर तालुक्यातील करीकट्टी गावात महिला दूध उत्पादक सहकारी संस्थेच्या नवीन केएमएफ दूध डेअरीचे उद्घाटन पार पडले. शेतीपेक्षा दुग्ध व्यवसायातून शेतकऱ्यांना अधिक शाश्वत उत्पन्न मिळू शकते, असे प्रतिपादन बेळगाव जिल्हा दूध संघाचे व्यवस्थापक डॉ. राकेश सी. एम. यांनी केले.

कक्केरी सिद्धारूढ मठाचे रामानंद स्वामीजी यांच्या दिव्य संनिध्यात या डेअरीचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.

या कार्यक्रमास डॉ. रमेश कंकणवाडी, सचिन हालप्पनवर, किशोर मिठारी, आकाश कांबळे, प्रीती कांबळे, रुक्कव्वा वड्डर, नम्रता कोटूर, कृष्णा परीट, अर्जुन मंगळकर, काडप्पा चव्हाण, गणेश बसनायक, नागप्पा तळवार आणि संतोष कुकडोळी आदी उपस्थित होते.

Tags: