बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील खिळेगाव बसवण्णा क्षेत्रातील देवाच्या नंदीवर असामाजिक तत्त्वांनी ॲसिड किंवा पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची संशयास्पद घटना उघडकीस आली आहे.

या अमानुष कृत्यामुळे नंदीच्या शरीराचा काही भाग गंभीर भाजला असून तो वेदनेने विव्हळत असल्याचे पाहून स्थानिकांनी तीव्र हळहळ व्यक्त केली आहे.

घटना निदर्शनास येताच स्थानिकांनी व भाविकांनी जखमी नंदीवर तात्काळ प्राथमिक उपचार करून त्याची शुश्रूषा सुरू केली. श्रद्धेने पूजल्या जाणाऱ्या या मुक्या प्राण्यावरील क्रौर्यामुळे परिसरात मोठा संताप व्यक्त होत आहे.

या घटनेची सखोल चौकशी करून दोषींचा तात्काळ शोध घ्यावा आणि त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी प्राणीप्रेमी व भाविकांनी केली आहे. ही घटना अथणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.


Recent Comments