सहकार मंत्री लक्ष्मण सवदी यांच्या प्रयत्नांतून अथणी येथील जोड तलाव विकास कामाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, नगरपरिषद अध्यक्षा शिवलीला बुटाळी यांच्या हस्ते तलाव भरणी योजनेचा प्रारंभ करण्यात आला.


सहकार मंत्री लक्ष्मण सवदी यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे शंभराहून अधिक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या जोड तलाव विकास कामाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. याचाच भाग म्हणून नगरपरिषद अध्यक्षा शिवलीला बुटाळी, उपाध्यक्षांसह प्रशासकीय मंडळाचे सदस्य आणि युवा नेते शिवकुमार सावदी यांनी पूजन करून लहान तलाव भरणी योजनेचा प्रारंभ केला.

जोड तलावाचा विकास करून अथणी शहर सुंदर बनवणे हे सहकार मंत्री लक्ष्मण सावदी यांचे स्वप्न होते. या पार्श्वभूमीवर जोड तलाव विकास योजना तयार करून तिची अंमलबजावणी केली जात आहे. या विकासासाठी नगरपरिषदेचे सर्व सदस्य, अधिकारी आणि कंत्राटदारांचे अभिनंदन करत असल्याचे शिवकुमार सवदी यांनी म्हटले.
जोड तलाव ही अथणीच्या जनतेची मालमत्ता असून तिचे जतन करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. पूजेनंतर फुले किंवा पाणी दूषित होईल अशा वस्तू तलावात टाकू नयेत आणि जलस्रोतांचे रक्षण करावे, असे आवाहन नगरपरिषद अध्यक्षा शिवलीला बुटाळी यांनी केले.
या वेळी उपाध्यक्षा भुवनेश्वरी यक्कंची, सदस्य मल्लकार्जुन बुटाळी, प्रमोद भिल्लूर, राजशेखर गुदोडगी, रियाज सनदी, मृणालिनी देशपांडे, रमेश पवार, उदय सोळसी, बाबू खेमलापूर, बी. एन. पाटील, विश्वनाथ गडदे यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदार उपस्थित होते.


Recent Comments