अथणी शहरातील जत रोडवर मध्यरात्रीनंतर भीषण आग लागून एक मोठे फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान पूर्णपणे जळून खाक झाले.

जत रोडवरील ब्रह्मा एंटरप्रायझेस या प्रसिद्ध दुकानात भल्या पहाटे साडेतीनच्या सुमारास आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले आणि दुकानातील सोफा, बेड, टीव्ही, फ्रिज तसेच कपडे असा सर्व साठा जळून खाक झाला.


स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र यश आले नाही. अग्निशामक दलाच्या गाड्यांनी सुमारे दोन तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. या दुर्घटनेत १ कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

सुदैवाने घटनेच्या वेळी दुकानात कोणीही नसल्याने जीवितहानी टळली. अथणी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.


Recent Comments