Athani

अथणीतील शिवशक्ती लॉजवर पोलिसांची धाड

Share

अथणी शहरातील शिवशक्ती लॉजवर बेकायदेशीर देहविक्रीचा व्यवहार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी अचानक धाड टाकून एका आरोपीला अटक केली.

अथणीचे पोलीस निरीक्षक संतोष हळ्ळूर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या धाडी दरम्यान एका महिलेची सुरक्षित सुटका करण्यात आली.

या प्रकरणी अरताळ गावचा रहिवासी माळप्पा दिलीप कांबळे याला पोलिसांनी घटनास्थळावरून ताब्यात घेतले.

देहविक्रीच्या या व्यवसायाला सहकार्य केल्याप्रकरणी लॉज व्यवस्थापक राहुल मड्डी आणि गणेश संकपाळ यांच्यावरही गंभीर आरोप आहेत.

या प्रकरणी अथणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार आरोपींचा शोध आणि पुढील तपास पोलीस करत आहेत.

Tags: