Belagavi

रुक्मिणीनगरात ७ कोटींच्या विकासकामांना सुरुवात

Share

बेळगावच्या रुक्मिणीनगरात ७ कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांना आमदार आसिफ सेठ यांनी सुरुवात केली. यामध्ये रस्ते आणि गटारींच्या कामांचा समावेश आहे.

बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी युवा नेते अमान सेठ, ज्येष्ठ नेते, नगरसेवक आणि स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत या कामांचे भूमिपूजन केले. या योजनेंतर्गत डांबरी रस्ते, काँक्रिट रस्ते आणि गटारींची कामे हाती घेण्यात आली आहेत. यामुळे स्थानिक नागरिकांच्या नागरी समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे उद्दिष्ट आहे.

यावेळी बोलताना आमदार आसिफ सेठ यांनी बेळगाव शहराच्या विकासासाठी विविध योजनांमधून निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती दिली. महापालिकेच्या विशेष अनुदानातून ७५ कोटी, अल्पसंख्याक अनुदानातून ५० कोटी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून २० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच ४५० कोटी रुपये खर्चाच्या उड्डाणपूल योजनांची कामे प्रगतिपथावर असल्याचे त्यांनी सांगितले.

बिम्स सिव्हिल रुग्णालयातील सुपर स्पेशालिटी आणि माता-बाल संगोपन विभागाच्या विकासासाठी २०० कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आगामी अधिवेशनाच्या वेळी मुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते किदवाई स्मारकाजवळ ४० कोटी रुपये खर्चाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

Tags: