Belagavi

मिनी ऑलिम्पिक पदकविजेत्या बेळगावच्या खेळाडूंचा सत्कार

Share

बंगळुरू येथे झालेल्या मिनी ऑलिम्पिक स्पर्धेत पदके मिळवणाऱ्या बेळगावच्या दोन युवा खेळाडूंचा भरतेश शिक्षण संस्था आणि बेळगाव जिल्हा वेटलिफ्टिंग संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला.

वेटलिफ्टिंगच्या ६१ किलोवरील वजनगटात सुवर्णपदक मिळवणारी आयुषी धामणेकर आणि ६० मीटर धावण्याच्या स्पर्धेत रौप्यपदक पटकावणारा अर्णव गोद्याळकर यांच्या कामगिरीचे कौतुक करण्यात आले. त्यांच्या मेहनतीचे आणि यशाचे अभिनंदन करून मान्यवरांनी त्यांना प्रोत्साहन दिले.

यावेळी बेळगाव जिल्हा वेटलिफ्टिंग संस्थेचे अध्यक्ष हिराचंद कलमणी, उपाध्यक्ष सुनील आपटेकर, भरतेश शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. विनोद दोड्डण्णवर, वेटलिफ्टिंग संस्थेच्या सचिव नीता गंगरेड्डी, प्रशिक्षक तथा सहसचिव सदानंद माळशेट्टी, खजिनदार अनुराधा तिगडी, शारीरिक शिक्षण संचालक प्रदीप जुवेकर आणि आकाश मंडोळकर उपस्थित होते. या युवा खेळाडूंनी भविष्यातही जिल्ह्याचे आणि राज्याचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा मान्यवरांनी दिल्या.

Tags: