Belagavi

धनंजय जाधव यांच्याकडून २५ हजार सुगंधी उटण्याच्या पाकिटांचे वाटप

Share

दिवाळीनिमित्त भाजप नेते धनंजय जाधव यांच्या पुढाकाराने बेळगाव शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना २५ हजार सुगंधी उटण्याच्या पाकिटांचे मोफत वाटप करण्यात आले.

अभ्यंगस्नानाची परंपरा जपण्यासह सर्वांपर्यंत सणाचा आनंद पोहोचविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

दिवाळीच्या पहाटे अभ्यंगस्नानाला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. या स्नानासाठी वापरण्यात येणारे सुगंधी उटणे प्रत्येक घरापर्यंत पोहोचावे आणि परंपरा कायम राहावी, या हेतूने धनंजय जाधव यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते.

समाजातील सर्व घटकांना दिवाळीच्या आनंदात सहभागी होता यावे, या उद्देशाने शहरासह ग्रामीण भागात उटण्याच्या पाकिटांचे वितरण करण्यात आले. प्रेम, विश्वास आणि आनंदाची देवाणघेवाण हे दिवाळीचे वैशिष्ट्य असून, प्रत्येकाच्या घरात सणाचा आनंद नांदावा, अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली. यावेळी सर्व नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छाही देण्यात आल्या.

Tags: