बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील मारिकट्टी गावात बसस्थानकाच्या अभावामुळे ग्रामस्थ आणि शाळकरी विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

अनेक वर्षांपूर्वी बांधलेले बसस्थानक सध्या पूर्णपणे पडझड झाले असून परिसरात झाडे-झुडपे उगवली आहेत. यामुळे उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.

योग्य व्यवस्था नसल्यामुळे विद्यार्थ्यांना आणि इतर प्रवाशांना स्थानिक दुकानांच्या किंवा मंदिरांच्या आसऱ्याला उभे राहावे लागत आहे.

अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या या बसस्थानकाची इमारत हटवून नवीन स्थानक उभारले जाणार की याची दुरुस्ती होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मारिकट्टी येथील बसस्थानक कित्येक वर्षांपासून दुरवस्थेत आहे. रोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना आसरा नसल्याने दुकानांचा किंवा मंदिरांचा सहारा घ्यावा लागत आहे. प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित नवीन बसस्थानक उभारून द्यावे, अशी मागणी स्थानिक तरुणांनी केली आहे.

शानूल मत्तेखान, कित्तूर


Recent Comments