पाच वर्षांच्या कराटे सरावानंतर बेळगावच्या अयान गोकाककर याने ब्लॅक बेल्ट मिळवला. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये पदके मिळवणाऱ्या अयानचा मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला.

१४ नोव्हेंबर रोजी ऑटोनगर येथील पॅराडाईज हॉलमध्ये कराटे बेल्ट परीक्षा झाली. जिल्हा मुख्य परीक्षक गजेंद्र काकतीकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या परीक्षेत ५० कलर बेल्ट विद्यार्थी सहभागी झाले होते. ब्लॅक बेल्ट गटात अयानने परीक्षा दिली.

अयान महांतेश नगर येथे प्रशिक्षक परशुराम काकती यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या पाच वर्षांपासून कराटेचे प्रशिक्षण घेत आहे. त्याने विविध राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके मिळवली आहेत. त्याच्या कामगिरीची दखल घेत इंडियन कराटे क्लब आणि बेळगाव जिल्हा स्पोर्ट्स कराटे असोसिएशनचे अध्यक्ष गजेंद्र काकतीकर यांनी ब्लॅक बेल्ट, प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव केला. अयानचे पालक सुलतान गोकाककर आणि हिना कौसर गोकाककर यांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला सुबेदार डी. हेम्ब्रोम, महेश कदम, दीपक मुन्नोळी, गंगाधर सूर्यवंशी, शफी गोकाककर आणि मराठा इन्फंट्रीचे सुबेदार मेजर संदीप खोत उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्य प्रशिक्षिका हेमलता जी. काकतीकर यांच्यासह प्रशिक्षकांनी परिश्रम घेतले. पिंटू पाखरे यांनी सूत्रसंचालन केले.


Recent Comments