खानापूर शहरातील मराठा मंडळ हाय्यर सेकंडरी स्कूलच्या मुलींंच्या कबड्डी संघाने नुकताच झालेल्या 17 वर्षाखालील वयो
गटातील कबड्डी स्पर्धेमध्ये तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावुन त्या मुलींच्या कबड्डी संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

अंतिम सामना मराठा मंडळ हाय्यर सेकंडरी स्कूल विरुद्ध लिंगमठ हायस्कूल यांच्या अगदी अटीतटीचा होऊन शेवटी मराठा मंडळाच्या मुलीच्या कबड्डी संघाने भाजी मारली. व आपले स्थान जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निश्चित केले. सदर विद्यार्थ्यांनी शाळेचे मुख्याध्यापक के. व्ही.कुलकर्णी यांचे सहकार्य तर क्रीडा शिक्षक वाय .एफ निलजकर व चंद्रकांत गोमानाचे यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभत आहे.विजय मुलींच्या कबड्डी संघाला हायस्कूलच्या सर्व शिक्षकांनी शुभेच्छा दिल्या.
या यशाकरिता मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजश्रीताई नागराज व मंडळीचे संचालक शिवाजीराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
विजयी मुलींच्या कबड्डी संघाचे खानापूर तालुक्यातुन अभिनंदन होत आहे.



Recent Comments