शासकीय नियमांचे उल्लंघन करून दसऱ्याच्या सुट्ट्यांमध्ये शाळा सुरू ठेवणाऱ्या आणि अतिरिक्त वर्गांच्या नावाखाली विद्यार्थ्यांची सुट्टी रद्द करणाऱ्या शिक्षण संस्थांवर श्रीराम सेनेने तीव्र संताप व्यक्त केला आहे.

याप्रकरणी श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष रविकुमार कोकितकर यांनी सार्वजनिक शिक्षण खात्याच्या उपसंचालक (डीडीपीआय) लिलावती हिरेमठ यांना निवेदन सादर केले.

शासनाने ३ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर या कालावधीत अधिकृतपणे दसऱ्याची सुट्टी जाहीर केली आहे. मात्र, काही खासगी शिक्षण संस्था या नियमांचे उल्लंघन करून १० दिवस अतिरिक्त वर्ग भरवत असल्याचा आरोप रविकुमार कोकितकर यांनी केला आहे.
दसऱ्याच्या काळात हिंदू धर्मातील विविध सण आणि परंपरा येत असल्याने विद्यार्थ्यांना पूर्ण सुट्टी मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे बेकायदेशीरपणे शाळा चालवणाऱ्या संस्थांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी श्रीराम सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments