खानापूरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या उपस्थितीत झाली.


पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासह आगामी काळातील कार्यतंत्रावर बैठकीत चर्चा करण्यात आली.

बूथ पातळीवर पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याबरोबरच सरकारच्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. पक्षाच्या आगामी कामकाजाबाबत आमदार विठ्ठल हलगेकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
बैठकीला खानापूर तालुक्यातील कार्यकर्ते तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments