जलसंपदा मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी विजापूर जिल्ह्यातील अलमट्टी येथील लाल बहादूर शास्त्री धरणाला भेट देऊन पाहणी केली. मंत्री झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच अलमट्टी दौरा होता.

दौऱ्यादरम्यान त्यांनी स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर धरणाच्या दरवाजांची तसेच पाणीविसर्गाची प्रत्यक्ष पाहणी केली. अधिकाऱ्यांनी त्यांना धरणातील पाणीसाठा आणि आवक-जावक पाण्याची माहिती दिली.

अप्पर कृष्णा प्रकल्पातील जमीन अधिग्रहण आणि नुकसानभरपाईचे प्रश्न मार्गी लावण्यास प्राधान्य दिले जाईल. यासंदर्भात तिन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून कायदेशीर अडचणींवर लवकरच तोडगा काढला जाईल.

असे जलसंपदा मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी म्हटले.
सध्या पिण्याच्या पाण्याची कोणतीही टंचाई नाही. खरीप पिकांसाठी पाण्याची गरज असून महाराष्ट्रातील पाणलोट क्षेत्रात पाऊस होऊन धरण भरल्यास कालव्याद्वारे पाणी सोडले जाईल.
अशी माहिती जलसंपदा मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी दिली.


Recent Comments