kolhapur

बनश्री ग्रीन व्हील्स इलेक्ट्रिक टू-व्हीलर शोरुमचे उदघाटन

Share

कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे नव्याने सुरू केलेल्या बनश्री ग्रीन व्हील्स इलेक्ट्रिक दुचाकी शोरुमचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला.

बनश्री ग्रीन व्हील्स इलेक्ट्रिक दुचाकी शोरुमचा उद्घाटन सोहळा शनिवारी पार पडला. गडहिंग्लज येथील श्री जडीसिद्धेश्वर मठाचे श्री महंत सिद्धेश्वर स्वामीजी यांच्या दिव्य उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री हसन मुश्रीफ आणि कर्नाटक सरकारचे दिल्लीचे माजी विशेष प्रतिनिधी शंकर गौडा पाटील आणि इतर मान्यवरांनी बनश्री ग्रीन व्हील्स इलेक्ट्रिक टू व्हीलर शोरूमचा शुभारंभ केला . यावेळी उपस्थित मान्यवरांनी बनश्री ग्रीन व्हील्स इलेक्ट्रिक टू व्हीलर शोरुमच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी बनश्री ग्रीन व्हील्स इलेक्ट्रिक दुचाकी शोरुमचे प्रमुख चिराग संकेश्वरी व इतर मान्यवरांचा सहभाग होता.

Tags: