संविधानानुसार लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी काँग्रेस पक्ष नेहमीच लढण्यास तयार आहे, असे एआयसीसी सचिव, खानापूरच्या माजी आमदार आणि गोवा प्रभारी डॉ. अंजली निंबाळकर म्हणाल्या.
त्या गोव्यातील वास्को येथे आयोजित ‘संविधान बचाओ’ अभियान कार्यक्रमात सहभागी होऊन बोलत होत्या. गोवा विधानसभेत काँग्रेसचे १५ आमदार असून, ते ‘बब्बर शेर’ नेत्यांमुळेच आहेत. त्यामुळे गोवा काँग्रेस कमिटी जनसामान्यांच्या समस्या संविधानानुसार सोडवण्यासाठी नेहमीच सज्ज आहे. म्हणूनच गोवा काँग्रेस कमिटीने जनसामान्यांचा आवाज बनून त्यांना प्रतिसाद द्यावा, असे मार्गदर्शन त्यांनी केले.

यावेळी एआयसीसी कमिटीचे इतर पदाधिकारी, काँग्रेस पक्षाच्या विविध विभागांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments