Belagavi

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून आंदोलनस्थळाची पाहणी

Share

हलगा येथील सुवर्ण विधानसौधमध्ये कर्नाटक राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला 30 नोव्हेंबर 2026 पासून सुरुवात होणार आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावमध्ये विविध आंदोलनांची तयारी सुरू झाली आहे.

हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्यातील विविध भागांतून शेतकरी संघटना, सामाजिक संघटना तसेच विविध मागण्यांसाठी लढा देणाऱ्या संघटना बेळगावमध्ये दाखल होत असतात. आपल्या प्रलंबित मागण्या सरकारसमोर मांडून त्या मान्य करून घेण्यासाठी या संघटनांकडून आंदोलन, धरणे आणि निदर्शने करण्यात येतात.

या आंदोलनांसाठी सरकारकडून संघटना आणि नागरिकांना मंडप उभारण्यासाठी निश्चित जागा उपलब्ध करून दिली जाते. याच पार्श्वभूमीवर आंदोलनस्थळाची पूर्वतयारी आणि जागेची पाहणी करण्यासाठी बेळगावचे पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांसह अलारवाड क्रॉस येथील हलगा-मच्छे रोड परिसराला भेट दिली.

यावेळी अधिवेशन काळात विविध संघटनांकडून होणारी आंदोलने लक्षात घेऊन मंडप उभारणीसाठी उपलब्ध असलेल्या जागेची पाहणी करण्यात आली. तसेच आंदोलनकर्त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे आणि अधिवेशन काळात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाकडून पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे.

हिवाळी अधिवेशनासाठी आता काही दिवस शिल्लक असल्याने पोलीस प्रशासनाकडून तयारीला वेग आला आहे.

Tags: