kolhapur

दिवंगत डी. वाय. पाटील यांच्या निवासस्थानी डॉ प्रभाकर कोरे यांची भेट

Share

पश्चिम बंगाल, बिहार आणि त्रिपुरा राज्यांचे माजी राज्यपाल दिवंगत डी. वाय. पाटील यांच्या कोल्हापूर येथील निवासस्थानी केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ प्रभाकर कोरे यांनी रविवारी संध्याकाळी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले

डॉ. प्रभाकर कोरे यांनी दिवंगत डी. वाय. पाटील यांच्यासोबत असलेल्या स्नेहपूर्ण संबंधांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी प्रार्थना केली

यावेळी बेळगाव दक्षिण मतदारसंघाचे आमदार अभय पाटील, ॲडव्होकेट रविराज पाटील आणि दिवंगत नेत्याचे सुपुत्र आमदार सतेज पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली

Tags: