बेळगाव ग्रामीणच्या आमदार आणि माजी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी कुटुंबीयांसह कोल्हापूरच्या प्रसिद्ध करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिराला भेट देऊन देवीचे दर्शन घेतले.

यावेळी त्यांनी विशेष पूजा करून कुटुंबाच्या सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धीसाठी तसेच सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.


महालक्ष्मी देवीच्या दर्शनाने मनाला अपार शांती आणि समाधान मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. देवीच्या सान्निध्यात घालवलेले क्षण आध्यात्मिक समाधान आणि सकारात्मक ऊर्जा देणारे ठरल्याचेही त्यांनी सांगितले.

यानंतर त्यांनी सह्याद्री पर्वतरांगेतील प्रसिद्ध ज्योतिबा मंदिराला भेट दिली. तेथेही देवाचे दर्शन घेऊन विशेष पूजा केली आणि भक्तिभावाने प्रार्थना केली. निसर्गरम्य परिसरात वसलेल्या या तीर्थक्षेत्रात त्यांनी काही काळ आध्यात्मिक वातावरणाचा अनुभव घेतला.
यावेळी विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांच्यासह कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.


Recent Comments