kolhapur

“काळ्या दिनी” शिवसैनिक हजारोंच्या संख्येने सहभागी होणार!

Share

बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या “काळा दिन” कार्यक्रमाला शिवसैनिक हजारोंच्या संख्येने सहभागी होणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने कोल्हापुरात ही महत्वपूर्ण घोषणा करण्यात आली.

भाषावार प्रांतरचनेवेळी मराठी बहुल सीमाभाग अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आला. याच्या निषेधार्थ महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने गेल्या ६६ वर्षांपासून केंद्र सरकारच्या निषेधार्थ एक नोव्हेंबरला काळा दिन गांभीर्याने पाळण्यात येतो. त्यानुसार येत्या बुधवार दिनांक एक रोजी बेळगावात काळा दिन पाळण्याचे महाराष्ट्र एकीकरण समितीने ठरविले आहे. या कार्यक्रमाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

पक्षाचे शिवसैनिक हजारोंच्या संख्येने सहभागी होणार आहेत. कोल्हापूर येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी व शिवसैनिक १ नोव्हेंबर २०२३ रोजी बेळगाव येथे “काळा दिन” या आंदोलनात हजारोंच्या संख्येने बेळगावला जाऊन सहभागी होतील अशी माहिती शिवसेना उपनेते व कोल्हापूर जिल्हा प्रमुख संजय पवार आणि कोल्हापूर लोकसभा सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.

दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या या घोषणेनंतर सीमाभागातील मराठी बांधवांमध्ये चैतन्य पसरले आहे.

Tags: