जिम स्विम अकॅडमी कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित विजयदुर्ग खाडी जलतरण स्पर्धेत बेळगावमधील आबा व हिंद स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंनी विशेष ठसा उमटवला आहे.

सिंधुदुर्गमध्ये संपन्न झालेल्या विजयदुर्ग खाडी जलतरण स्पर्धेत बेळगावच्या आबा व हिंद स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदकांसह घवघवीत यश संपादन केले आहे.

या स्पर्धेत हर्षवर्धन कर्लेकर याने १ किमी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. तसेच गाथा दड्डीकर, गणीष्का यलजी आणि स्मरण मंगळूरकर यांनी रौप्य पदके मिळवली. सोयरा मन्नोळकर हिने तृतीय क्रमांक पटकावला, तर रंजन कुलकर्णी, प्रसाद सायनेकर, मयुरेश जाधव आणि प्राजक्ता प्रभू यांनीही विविध अंतराच्या स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली.
या सर्व खेळाडूंना एनआयएस प्रशिक्षक विश्वास पवार आणि त्यांच्या टीमचे मार्गदर्शन लाभले. क्लबचे अध्यक्ष शितल हुलभते आणि पदाधिकाऱ्यांनी सर्व यशस्वी जलतरणपटूंचे अभिनंदन केले आहे.


Recent Comments