खानापूरच्या लायन्स क्लबने खानापूर तालुक्यातील ऊस तोडणी कामगारांना टूथपेस्ट, खोबरेल तेल, साबण व इतर साहित्य यांसारख्या दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किटचे वाटप केले.


सध्या साखर कारखान्यांचा गाळप हंगाम जोरात सुरु आहे. त्यानिमित्त महाराष्ट्र व अन्य ठिकाणच्या ऊसतोड मजुरांच्या टोळ्यांचे खानापूर तालुक्यात आगमन झाले आहे. पोटापाण्यासाठी कोसो दूर आलेल्या या ऊसतोड मजुरांना व त्यांच्या कुटुंबाना दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे वाटप करण्याचा सामाजिक उपक्रम खानापूर लायन्स क्लबने राबवला. तसेच यावेळी हिवाळी शालींचे वाटप करण्यात आले.

यावेळी खानापूर लायन्स क्लबचे अजित पाटील, डॉ. ऐश्वर्या चव्हाण, डॉ. भेट्टागुड्डा यांनीही या ऊसतोड कामगारांच्या आरोग्याची तपासणी केली. एकंदर ऊसतोड मजुरांच्या आरोग्याची काळजी घेऊन त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना दैनंदिन साहित्य वाटप करणाऱ्या खानापूर लायन्स क्लबचे कार्य खरोखरच वाखाणण्याजोगे असल्याची प्रशंसा जनतेत होत आहे.


Recent Comments