Khanapur

बेळगावच्या सीडी षड्यंत्राची राज्यात चर्चा हे विषादनीय : सी. एम. इब्राहिम

Share

बेळगाव जिल्ह्याने राज्याला अनेक मोठे नेते दिले आहेत. पण आता बेळगावच्या सीडी षड्यंत्राची राज्यात चर्चा सुरु झाली आहे हे विषादनीय आहे अशी प्रतिक्रिया जेडीएसचे राज्य अध्यक्ष सी. एम. इब्राहिम यांनी दिली.

खानापुरात एका कार्यक्रमानिमित्त आले असता, पत्रकारांशी बोलताना इब्राहिम म्हणाले, बेळगाव जिल्ह्याने मोठे राजकीय नेते दिले आहेत. पण आज सीडी षड्यंत्रामुळे हा जिल्हा राज्यात चर्चेत आहे. माझी मुले सीडी चर्चेबद्दल विचारत आहेत. सीडी म्हणजे काय? त्यात काय आहे? त्या मुलांना मी काय सांगू? सीडी का काढलीस? कोण नागकन्या म्हणतो तर कोण विषकन्या. मग शिवकुमार म्हणाले तेही सत्य अन रमेश जारकीहोळी म्हणाले तेही सत्य आहे? काही मानमर्यादा असेल तर सीडी प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवा अशी मागणी त्यांनी केली.
असे मंत्री आणि अशा सीडी असत्या तर कोविड आल्याशिवाय राहील?, अतिवृष्टी झाल्याशिवाय राहील?
सीडीच्या माध्यमातून ब्लॅकमेल करत आले असल्याचे रमेशचे म्हणणे बरोबर आहे.

कित्तूर राणी चेन्नम्माचा वंशज म्हणून सांगण्यास ते पात्र आहेत का असा सवालही सी. एम. इब्राहिम यांनी केला.

Tags: