राज्यातील सायकलपटूंचा कुंभमेळा मानली जाणारी विजापूरची राज्यस्तरीय रोड सायकलिंग चॅम्पियनशिप स्पर्धा याच महिन्याच्या २१ व २२ तारखेला होणार आहे.

राज्य अमॅच्युअर सायकलिंग असोसिशनचे अध्यक्ष राजू बिरादार यांनी सोमवारी विजापुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, अनेक वर्षानंतर विजापुरात येत्या २१ व २२ ऑक्टोबरला राज्यस्तरीय रोड सायकलिंग चॅम्पियनशिप स्पर्धा घेण्यात येत आहे. त्यात सुमारे २५० सायकलपटू भाग घेणार आहेत. १४, १६ आणि १८ वर्ष वयोगटात १८ प्रकारचे इव्हेंट्स या स्पर्धेत होतील.

या राज्यस्तरीय रोड सायकलिंग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी सुमारे ७ लाख रु खर्च अपेक्षित असून दानशूरांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. तंदुरुस्तीसाठी सायकलिंग आवश्यक असून, सायकलिंगला प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात सरकारने सायकलपटूंसाठी झिरो ट्राफिक अर्थात केवळ सायकलसाथीचे ट्रॅक उभारावेत अशी मागणी त्यांनी केली. पत्रकार परिषदेला राज्य अमॅच्युअर सायकलिंग असोसिशनचे पदाधिकारी संजू फडतरे, संतोष कतकनहळ्ळी, श्रीकांत भट आदी उपस्थित होते.


Recent Comments