राज्यात पुढील महिन्यापासून रोज ५ लाख जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली. शनिवारी विजापूर जिल्ह्यातील आलमट्टी जलाशयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कृष्णा नदीला ओटी भरणे व गंगापुजनाचा कार्यक्रम झाला.

त्यानंतर त्यांनी विजापूर आणि बागलकोट जिल्ह्यांमधील लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांशी कोविड आणि महापुरासंदर्भात महत्वाची बैठक घेतली. यासंदर्भात त्यांनी महत्वाची माहिती आणि सल्ला-सूचना घेतल्या फ्लो त्यानंतर बैठकीत बोलताना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले, येत्या सप्टेंबरपासून राज्यात प्रतिदिन ५ लाख लोकांचे लसीकरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या पद्धतीने सलग ३ महिने लसीकरण केल्यास, राज्यातील सर्वांचे लसीकरण पूर्ण होईल.

बैठकीत विजापूर जिल्हा पालकमंत्री शशिकला जोल्ले, उमेश कत्ती, गोविंद कारजोळ यांच्यासह लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments