आज विधानसभेत, कागवाडचे आमदार राजू कागे यांनी, महसूल विभागाचे प्रधान सचिव राजेंद्र कटारिया यांच्याविरुद्ध अपमानास्पद वागणूक दिल्याबद्दल याचिका मांडली.
कागवाड मतदारसंघात सार्वजनिक इमारतीच्या बांधकामाबाबत चर्चा होत असताना, महसूल विभागाचे प्रधान सचिव राजेंद्र कटारिया यांनी आपला अपमान केला. तुम्हाला आणि जिल्हाधिकाऱ्यांना डोके नाही का ? असा प्रश्न करीत त्यांनी आमचा ओमान करीत आपल्या अहंकाराचे दर्शन घडविले आहे. 50-60 आमदारांनी या विरोधात मुख्यमंत्र्यांकडे आधीच याचिका सादर केली असून त्यांची इतरत्र बदली करावी, असे म्हटले असल्याचे कागे यांनी सांगितले.
आमदार सी.सी. पाटील, कलबुर्गी ग्रामीणचे आमदार बसवराज मट्टीमुड, एएसपी महेश मेघन्नवर, विरोधी पक्षनेते आर. अशोक, अरविंद बेल्लद, बसनगौडा पाटील-यत्नाळ आणि इतरांना निवडून आलेले प्रतिनिधी म्हणून अधिकाऱ्यांकडून महत्त्व दिले जात नाही. ते कायद्याच्या पलीकडे जाऊन काम करत आहेत. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री एच.के. पाटील यांनीयावेळी सूचना केल्या. त्यानंतर सभापती यू.टी. खादर यांनी, सखोल चौकशी केली जाईल आणि कारवाई केली जाईल, असे म्हटले.


Recent Comments