नव्या मंत्रिमंडळात माजी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना स्थान न मिळाल्याने बेंगळुरूत त्यांच्या समर्थकांनी आंदोलन केले.

नव्या मंत्रिमंडळात लक्ष्मी हेब्बाळकर यांना मंत्रिपद न मिळाल्याने बेंगळुरूतील चालुक्य सर्कल परिसरात समर्थकांनी आंदोलन केले. यावेळी निदर्शने करणाऱ्या समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पक्षश्रेष्ठी आणि मुख्यमंत्र्यांकडे पुन्हा निवेदन देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.

राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारानंतर हेब्बाळकर यांना संधी न मिळाल्याने समर्थकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आंदोलकांना पोलिसांनी बसमधून अन्यत्र हलविले.
यावेळी माध्यमांशी बोलताना एका नेत्याने, लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या मंत्रिपदासाठी यापूर्वी दिल्ली पातळीवर प्रयत्न झाले होते. आता पक्षश्रेष्ठी आणि मुख्यमंत्री यांच्याकडे थेट निवेदन देऊन अंतिम प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले.


Recent Comments