कागवाडचे आमदार राजू कागे म्हणाले की, राज्य सरकार प्रत्येक नागरिकाला स्वावलंबी बनवून चांगले जीवन जगता यावे या उद्देशाने कामगार विभागामार्फत मजूर व इतर कामगारांना हेल्प किटचे वाटप करण्यात येत आहे. कागवाडचे तहसीलदार राजेश बुर्ली, कामगार विभागाच्या अथणी तालुका अधिकारी भुवनेश्वरी ढमाले, सचिन ढमाले, भीमराव मरगाळे यांच्या उपस्थितीत बुधवारी उगार येथील आमदार मुख्यालयात किटचे वाटप करण्यात आले.

आमदार राजू कागे म्हणाले कि , राज्य सरकार मजूर म्हणून काम करणाऱ्या लोकांच्या कुटुंबीयांना मदत किट देत आहे. कामगारांच्या आरोग्यासाठी आणि इतर मदतीसाठी विम्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांच्या कष्टात आणि आनंदात सहभागी होण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. अथणी व कागवाड तालुक्यात २४ हजार मजूर असून त्यापैकी ७ हजार मजुरांची नोंद झाली आहे. उर्वरित कामगारांनी नोंदणी करावी.
ते म्हणाले की, कागवाड तालुक्यात 250 बांधकाम कामगार, 30 प्लंबर आणि 15 इलेक्ट्रिशियन कार्यरत आहेत. कामगार विभागाच्या तालुका अधिकारी भुवनेश्वरी ढमाले यांनी आमदारांना सविस्तर माहिती दिली. कृष्णा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शंकर वाघामोडे, राज्य कर्मचारी संघाचे अध्यक्ष गौडप्पा सद्दी, राजू मदने, संजय सलगरे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.


Recent Comments