मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या काठावर पूरस्थिती निर्माण झाली असून, अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे. कागवाडचे आमदार राजू कागे यांनी आज अधिकाऱ्यांसमवेत नदीकाठाची पाहणी केली . लोकांनी त्यांना हात जोडून , कायमस्वरूपी दिलासा देण्याची मागणी केली.

कागवाडचे आमदार राजू कागे यांनी अधिकाऱ्यांसमवेत आज अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्या, तालुक्यातील मंगावती , जुगुळ, शहापूर या गावांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी नदीकाठच्या 3 गावातील लोकांना गेल्या 20 वर्षांपासून दरवेळी समस्यांना सामोरे जावे लागत असून, जुगुळ ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष अनिल सुंके यांनी ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलवावे, अशी मागणी केली.

गेल्या 20 वर्षात निर्माण झालेली परिस्थिती सरकारच्या निदर्शनास आणून देऊन नदीकाठच्या लोकांच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा विचार सरकारने केला आहे. सध्या पुराचा धोका नाही. तालुका प्रशासन तुम्हाला सर्वतोपरी मदत करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.
चिक्कोडीचे उपविभागीय अधिकारी सुभाष संपगावी आणि कागवडचे तहसीलदार राजेश बुर्ली यांनी पूरस्थिती उद्भवल्यास खबरदारीच्या सर्व उपाययोजना पाळल्या जात असल्याची माहिती आमदारांना दिली.
राजेगौडा पाटील, अण्णासाहेब पाटील, मेहबूब किल्लेदार, विनोद बाशिंगे , कल्लाप्पा शिवराय, प्रल्हाद कोळी आदींचा सहभाग होता.


Recent Comments