Kagawad

आमदार राजू कागे यांच्या हस्ते मराठी शाळेच्या इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन

Share

राज्य सरकारने सर्व शासकीय शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण देण्यावर भर दिला असून, शिक्षण विभागामार्फत 36 लाख रुपये खर्चून शाळांच्या नवीन इमारती बांधल्या जात आहेत.असे कागवाड मतदारसंघाचे आमदार राजू कागे म्हणाले .

सोमवारी कागवाड येथील मराठी मुलांच्या शाळेच्या बांधकामाचे भूमिपूजन करून ते बोलत होते . कागवाड येथील एका मराठी शाळेत सुमारे दोनशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, शाळांची कमतरता असल्याने नवीन शाळा बांधण्यात येत असल्याचे आमदार म्हणाले, सर्व शिक्षकांना त्यांचे अध्यापनाचे कर्तव्य पार पाडण्याचा सल्ला दिला आणि , पालकांनी इमारतीच्या कामाच्या दर्जाची पाहणी करावी तसेच शाळा इमारत बांधकामाबाबत त्यांनी कंत्राटदारांना सक्त ताकीद दिली.

तसेच आमदार राजू कागे यांनी स्थानिक उर्दू शाळेत बांधलेल्या नवीन वर्गखोलीची उद्घाटन केल्यानंतर मुलांशी संवाद साधला. उर्दू शाळेतील सर्व शिक्षकांचा एसडीएमसी सदस्य आणि आमदारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

स्थानिक उर्दू शाळेच्या शिक्षकांनी आमदारांना 7वी इयत्तेपर्यंतच्या प्राथमिक शाळांना मान्यता द्यावी आणि यापुढे 10वीपर्यंतच्या उच्च माध्यमिक शाळांना मान्यता द्यावी, या त्यांच्या मागण्यांवर विचार करण्यास सांगितले. राज्याच्या शिक्षणमंत्र्यांशी बोलून मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कृष्णा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शंकर वागमोडे , संचालक सौरव पाटील, कागवाड पीकेपीएस अध्यक्ष ज्योतीकुमार पाटील, रमेश जोगुळे, पवन पाटील काका पाटील, चिदानंद आवटी, अधिकारी जयनंद हिरेमठ, वीराणा वाली, सचिन गुरू के.के.गावडे, अस्लम मुखंदर , बाबू सय्यद कंत्राटदार लक्ष्मण वाड . शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व एसडीएसमी चे सदस्य सहभागी झाले होते.

Tags: