Banglore

हेमंत निंबाळकर आता माहिती व जनसंपर्क विभागाचे आयुक्त

Share

कर्नाटक पोलीस दलातील तडफदार आयपीएस अधिकारी हेमंत निंबाळकर यांची आता माहिती व जनसंपर्क विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

बेळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून काम केलेले आणि राज्य पोलीस विभागात विविध पदांवर समर्थपणे सेवा बजावलेले आयपीएस अधिकारी हेमंत निंबाळकर यांची काँग्रेस सरकारमध्ये माहिती व जनसंपर्क विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

निंबाळकर यांनी काही वर्षांपूर्वी बेळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. बेळगाव शहर आणि जिल्ह्यातील अवैध धंदे, गुंडगिरी त्यांनी कठोरपणे मोडून काढली होती. त्यासाठी प्रसंगी एन्काउंटरचा आधार घेतला होता. शीतल चौगुले अत्याचार व खून प्रकरणातील प्रमुख आरोपी कुख्यात टोळीप्रमुख प्रवीण शिंत्रे याला एन्काउंटर करून यमसदनी धाडून ते प्रसिद्धीच्या झोतात आले.

विशेषतः बेळगाव शहरातील जातीय दंगलींना पायबंद घालून ते चांगलेच लोकप्रिय झाले होते. सध्या आयजीपी पदावर असलेले निंबाळकर आता माहिती व जनसंपर्क आयुक्त म्हणून नवी इनिंग सुरु करणार आहेत.

Tags: