Accident

लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारा कँटर उलटून १५ ते २० जण जखमी

Share

शिरूर आणि गुम्मगोळ गावादरम्यान लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारे कॅंटर वाहन रस्त्यावर उलटले. या वाहनातील १५ ते २० जण जखमी झाले आहेत .

हे वाहन धारवाड तालुक्यातील तिम्मापुर गावाकडून नवलगुंद तालुक्यातील बल्लूर गावाकडे जात होते. यावेळी नवलगुंद तालुक्यातील शिरूर ते गुम्मगोळ रस्त्याच्या दरम्यान चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी उलटली.त्यामुळे वाहनातील सुमारे 15-20 जण गंभीर जखमी झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना नवलगुंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

Tags: