गोकाक तालुक्यातील कोन्नूरजवळ वायव्य कर्नाटक राज्य रस्ते वाहतूक मंडळाची बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका लहान मुलीसह तिघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच एक मूल गंभीर जखमी झाले असून त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


हिडकलवरून गोकाककडे जाणारी बस आणि गोकाक फॉल्स येथील पॉर्बस शाळेतून कोन्नूरकडे जाणाऱ्या दुचाकीमध्ये हा अपघात झाला. या दुर्घटनेत सैफ मुल्ला (२९), त्यांची मुलगी सिजा मुल्ला (४) आणि सैफ यांचा मित्र इम्तियाज बडगाव (३५) यांचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीवर असलेले जिहान शाहरुख कुडचीकर हे मूल गंभीर जखमी झाले असून त्याला उपचारासाठी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघात घडताच बसचालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच गोकाक ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.


Recent Comments